संपादक-२०१२ - लेख सूची

मेंदू-विज्ञान विशेषांकाविषयी

मेंदू-विज्ञान ह्या विषयावरचा सुदीर्घ विशेषांक आजचा सुधारक च्या वाचकांच्या हातात देताना विशेष आनंद होत आहे. मेंदू-विज्ञान हे शरीरशास्त्र व मानसशास्त्र (वर्तनशास्त्र ह्या अर्थाने) दोन्ही दृष्टींनी महत्त्वाचे शास्त्र आहे. अलिकडच्या काळात ह्या शास्त्राने केलेली प्रगती थक्क करणारी आहे. अनेक ज्ञानशाखांमध्ये क्रांती घडवून आणण्यास ती कारणीभूत ठरली आहे. तत्त्वज्ञान ही तर सर्व शाखांची जननी मानली जाते. मेंदूविज्ञानाच्या …

संपादकीय

मेंदू-विज्ञानाचा तत्त्वज्ञानावर झालेला किंवा होऊ घातलेला परिणाम या विषयावरील ‘आजचा सुधारक’चा विशेषांक वाचकांच्या हाती देताना आम्हाला आनंद होत आहे. या विशेषांकामध्ये लेखनसाहाय्य करणाऱ्या लेखकांचे मनःपूर्वक आभार. गेल्या काही वर्षांत मेंदू-विज्ञानात लागलेल्या शोधांमुळे मेंदूचे कार्य कसे चालते त्याबद्दल अधिकाधिक माहिती जमा होत आहे. आत्तापर्यंत जे फक्त तर्काने जाणणे शक्य होते त्याचे प्रत्यक्ष प्रमाण मिळू लागले आहे. …